मुंबई -अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडत आहेत. यावेळी त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
राज्य अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७,५०० कोटींची तरतूद
देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. असा स्थितीत आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे.
आरोग्य क्षेत्र
कोरोनाच्या काळात आरोग्य सेवांसाठी भरीव तरतुद करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
- 11 शासकीय परिचारिका विद्यालयांचे महाविद्यालयात रुपांतरण
- आरोग्य सेवांमधील मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी पुढील पाच वर्षांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद.राज्यातील आरोग्य सुविधांच्या सुधारणांसाठी ७,५०० कोटी रुपयांच्या नव्या योजनांची तरतूद.
- संसर्गजन्य रोगांसाठी नवी रुग्णालये उभारण्याची योजना.
- कर्करोगासाठी राज्यात १५० रुग्णालयांमध्ये विशेष सोय.
- रुग्णालयांमधील आग प्रतिबंधक उपकरणांसाठी विशेष तरतूद.
- सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, परभणी याठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये उभारणार. या सर्वाच्या खर्चासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीबाबत बोलणी सुरू.
- रुग्णसेवेशी निगडीत शाखांना चालना देणार.
- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड पश्चात समुपदेशन केंद्र उभारणार.
हेही वाचा-महा अर्थसंकल्प २०२१ : व्यापाऱ्यांवर कोणतेही नवे कर लादू नयेत - फत्तेचंद रांका