महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'ईडी'बाहेर हजारो कार्यकर्ते राहणार उपस्थित..राष्ट्रवादीकडून शक्तीप्रदर्शनाचे संकेत - शरद पवार ईडी प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी ईडी कार्यालयाला भेट देणार असल्याने शहरात 'मी साहेबांसोबत' या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या मोहिमेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

' मी येतोय' या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या मोहिमेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता

By

Published : Sep 27, 2019, 9:00 AM IST

Updated : Sep 27, 2019, 9:34 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी ईडी कार्यालयाला भेट देणार असल्याने शहरात ' मी साहेबांसोबत' या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या मोहिमेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माध्यमातून राष्ट्रवादीकडून मोठे शक्तिप्रदर्शन केले जाण्याची माहिती आहे.

दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार हे बेलोरा येथे असलेल्या ईडी कार्यालयाला स्वेच्छेने भेट देणार असून, या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यभरातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून 'मी साहेबांसोबत' अशा नावाच्या हजारो टोप्या वाटण्यात आल्या आहेत. तसेच या आशयाची प्रिंट असलेले टी-शर्ट ही वाटण्यात येणार असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तसेच युवक-युवती संघटना, राष्ट्रवादी महिला संघटना यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा शरद पवार आज 'ईडी' कार्यालयात जाणार; कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून, उद्या आम्ही हजारोंच्या संख्येने शरद पवार यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी स्पष्टपणे शरद पवार यांनी केलेल्या आव्हानाला, 'माफ करा साहेब, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार..' असे ट्वीट केले आहे. यावरून शरद पवार यांसोबत ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Last Updated : Sep 27, 2019, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details