मुंबई- आदरणीय शरद पवारसाहेबांना यावर्षी ८१ वर्ष (Sharad Pawar 81 Birthday) पूर्ण होत असून कोरोनामुळे यावर्षी आदरणीय पवारसाहेब व्हर्च्युअल रॅलीच्या (Birthday Virtual Rally) माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तसेच यावेळेस भेटण्यासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
'शरद पवारांच्या वाढदिवशी 'व्हर्च्युअल रॅली' द्वारे शुभेच्छा द्या' - जयंत पाटील
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर (Omicron Variant) व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती आज त्याने प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांना दिली.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर (Omicron Variant) व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती आज जयंत पाटील यांनी (Jayant Patil) प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांना दिली.
व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण
वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला 'महाराष्ट्र युथ कार्निवल' (Maharashtra Youth Carnival) असा आगामी काळाकरीता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -Ajit Pawar on Booster Dose : बूस्टर डोसचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - अजित पवार