महाराष्ट्र

maharashtra

एसटी कामगारांच्या विमा योजनेची चौकशी करा, एसटी कामगार सेनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेचे सभासद व कर्मचाऱ्यांसाठी असलेले कल्याणकारी आणि अपघाती विमा योजनेचे नुतनीकरण आणि निविदेमधील अनियमित असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

By

Published : Mar 15, 2021, 10:31 PM IST

Published : Mar 15, 2021, 10:31 PM IST

एसटी कामगार सेना
एसटी कामगार सेना

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेचे सभासद व कर्मचाऱ्यांसाठी असलेले कल्याणकारी आणि अपघाती विमा योजनेचे नुतनीकरण आणि निविदेमधील अनियमित असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या योजनेचे निविदा प्रक्रियेची बँकेचे अध्यक्ष व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून करण्यात आलेली आहे.

एसटी बँकेवर बोजा -

एसटी को ऑपरेटिव्ह बँकेचे तब्बल 82 हजार 100 सभासद व कर्मचारी यांच्याकरिता बँकेने कल्याणकारी योजना व अपघात विमा योजना सुरू केली होती. या योजनेचा हेतू कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत व्हावी याकरिता ही योजना सुरू होती. या सभासदांसह बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेची मुदत 7 मार्चला संपली होती. मात्र नवीन योजना लागू करण्यासाठी तांत्रिक कारणास्तव 16 मार्च उजाडलेला आहे. परिणामी 8 मार्च ते 15 मार्च या कालावधीत मृत्यू पावलेल्या किंवा अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार रक्कमेचा बोजा बँकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नाही-

बँकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केला आहे. त्यामुळे एसटी कामगार सेनेकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोरोनाचे कारण देत मुंबईतील मध्यवर्ती कार्यालय ऐवजी निविदा पुण्यातील एका हॉटेलमध्ये निविदा उघडण्यात आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे निविदाकारांशिवाय या निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया शंका उपस्थित होत आहे.

चौकशी करण्याची मागणी..?

याआधी एसटी बँकेने निविदा प्रक्रिया तांत्रिक कारण देत 8 मार्चला रद्द केली होती. मात्र, त्यानंतर 9 मार्चला जाहिरात 10 मार्च ला सायंकाळी 4 वाजेपर्यंतची मुदत नव्याने निविदांसाठी देण्यात आली. अवघ्या चोवीस तासात चार निविदा प्राप्त ही झाल्या. त्यामुळे एवढ्या कमी वेळेत आलेले आणि निविदा पाहून यात काहीतरी काळेबेरे असल्याचा दाट संशय येतो, याशिवाय दोन वेळा पार पडलेल्या निविदा प्रक्रियांत आकड्यात काहीतरी बदल झाल्याची चर्चा बँकेत आहे. त्यामुळे एसटी बँकेच्या अध्यक्ष अध्यक्षांनी याप्रकरणी तात्काळ चौकशी करून योग्य निर्णय घेण्याचे मागणी एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details