मुंबई - आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) आर्थिक गुन्हे शाखेकडून ( Economic Offences Wing Mumbai Police ) किरीट सोमय्यांची चौकशी सुरू ( Kirit Somaiya Enquiry ) आहे. आज तिसऱ्या दिवशी चौकशी संपल्यानंतर सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचे तेरावे घालणार असल्याचा थेट इशारा ( Kirit Somaiya Criticized Thackeray Government ) दिला. त्यामुळे आगामी काळात सोमय्या विरोधात आघाडी सरकार असा सामना रंगणार ( Kirit Somaiya Vs Mahavikas Aghadi ) आहे.
ठाकरे सरकारविरोधात संताप :आयएनएस विक्रांत प्रकरणी जमा केलेला ५७ कोटी रुपयांचा निधी राज्यपाल कार्यालयाला जमा न करता अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणी चौकशी सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवसाची चौकशी संपल्यानंतर किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकार विरोधात संताप व्यक्त केला. तेरा तास काय तेरा दिवस चौकशी करा. न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे. नील सोमय्यालाही संरक्षण दिले आहे. तसेच ठाकरे सरकारने दाखल केलेला गुन्हा बनावट आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे.
आम्ही घाबरणार नाही : ठाकरे सरकारचा दबावाला आम्ही घाबरत नाही. माझ्या ९० वर्षाच्या आईनेही थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना निरोप पाठवून सोमय्या परिवाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझे संपूर्ण कुटुंब चौकशीसाठी हजर राहायला तयार आहे. तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकायचा प्रयत्न केला तरी घाबरणार नाही. मात्र ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांचा तेरावे करूनच थांबणार, असा इशारा सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.