मुंबई -देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच विषाणूमुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असताना आता पुन्हा एकदा बीए ४ व बीए ५ व्हेरीयंटचे ५ रुग्ण आढळून आले ( Mumbai corona update ) आहेत. यामुळे आतापर्यंत मुंबईत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ३३ तर राज्यातील रुग्णांची संख्या ५४ झाली ( Maharashtra corona cases today ) आहे. बीए व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
मुंबईत नवे ५ रुग्ण - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार ( corona update today ) बीए ५ व्हेरीयंटचे ३ आणि बी ए ४ चे २ असे एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई येथील आहेत. १० ते २० जून २०२२ या कालावधीत या रुग्णांचे नमुने घेण्यात ( corona tests in Mumbai ) आले आहेत. रविवारी आढळून आलेल्या ५ रुग्णांपैकी ० ते १८ वयोगटातील १, २६ ते ५० वयोगटातील ३ तर ५० वर्षांपेक्षा जास्त १ रुग्ण आहेत. यामध्ये ३ पुरुष तर २ स्त्रिया आहेत. आज नव्याने ५ रुग्ण आढळून आल्याने राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ३३, नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ रुग्ण आढळले आहेत.