मुंबई- साउथ सेंट्रल या मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि वंचित आघाडी यांचे एकमेकांना तगडे आव्हान असताना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसते. २०१४ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५३.०९ टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ते वाढले आहे. त्यामध्ये पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. महिलांचेही मतदान त्यापाठोपाठ पाहायला मिळाले आहेत.
मुंबई साउथ सेंट्रल अनुक्रमांक ३० या मतदारसंघात एकूण १४ लाख ४० हजार ११० मतदार होते. त्यापैकी ६ लाख ६२ हजार ३३५ महिला मतदार आहेत व ७ लाख ७७ हजार ७१६ पुरुष मतदार आहेत. या एकूण मतदारांपैकी फक्त ७ लाख ९५ हजार ३९९ लोकांनीच मतदान केले. यामध्ये महिला ३ लाख ६३ हजार १०७ आहेत व पुरुष ४ लाख ३२ हजार २६० आहेत. या मतदारसंघात एकूण ५५.२३ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई साऊथ सेंट्रलमधील ३० मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ मतदार केंद्रनिहाय मतदान -
अनुक्रमांक १७२ अनुषक्ती नगर एकुण मतदार २ लाख ४७ हजार ८७८ त्यापैकी १ लाख ३८ हजार ७५२ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये महिला ५५.६३% आणि पुरुषांचे ५६.८९% इतके मतदान झाले आहे. अनुषक्तिनगर या मतदार संघात एकूण ५५.९८ टक्के मतदान झाले. अनुक्रमांक १७३ चेंबूर एकूण मतदार २ लाख ५२ हजार ४२६ त्यापैकी १ लाख ४३ हजार २०६ इतक्या मतदारांनी मतदान केले आहेत. यामध्ये महिलांची टक्केवारी ५५.१८ टक्के आहे तर पुरुष ४७.४० टक्के आहेत. या मतदान केंद्रात ५६.७३ टक्के मतदान झाले आहे. तसेच अनुक्रमांक १७८ धारावी या मतदार केंद्रात एकुण मतदार २ लाख ४७ हजार २६५ इतके आहेत. त्यापैकी एक लाख १८ हजार ८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यामध्ये महिलांचे प्रमाण ४८.१९ टक्के इतके आहे. तर, पुरुषांचे प्रमाण ४७.६९ टक्के इतके आहे. धारावी झोपडपट्टी या मतदार केंद्रात एकूण ४८.०९ टक्के मतदान झाल्याचे दिसते.
तसेच सायन-कोळीवाडा अनुक्रमांक १७९ या मतदारसंघात एकूण २ लाख ५४ हजार ९१० मतदार होते. त्यापैकी १ लाख ३७ हजार ११५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ५४.३५ टक्के पुरुषांची संख्या आहे. तर, ५३.०७ टक्के इतकी महिला मतदारांची संख्या आहे. या मतदारसंघात एकूण ५३.७९ टक्के मतदान झालेले आहे. तसेच १८० अनुक्रमांक वडाला या मतदारसंघात एकूण २ लाख ३ हजार २२१ मतदार होते. त्यापैकी १ लाख २१ हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ६०.१७ पुरुष मतदारांनी मतदान केले व ५८.३७ टक्के इतक्या महिला मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण ६०.६३ टक्के इतके मतदान झाल्याचे चित्र आहे.
तसेच १८१ अनुक्रमांक माहीम मतदारसंघात एकूण २ लाख ३४ हजार ४१० मतदार होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार २३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुषांची संख्या ५९ टक्के आहे व महिलांची टक्केवारी ५७.१३टक्के इतकी आहे. या मतदारसंघात एकूण ५८.१२टक्के मतदान झाल्याचे दिसते. यावरून मुंबई साउथ सेंट्रल या मतदारसंघात मुंबईतील एकूण मतदारसंघांपैकी अधिक मतदान झाल्याचे चित्र दिसते. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी या मतदारसंघात अधिक मतदान झाल्याची माहिती मिळते. यावरून अनुषक्ती नगर, चेंबुर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहीम यासारख्या झोपडपट्टीतील लोक मतदानाविषयी अधिक जागृत असल्याचे दिसून आले. भविष्यात यापेक्षाही अधिक मतदान होईल, अशी या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.