महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 400 च्या वर, 1 मृत्यू

बईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ ( Increase in the number of corona virus patients ) झाली होती. मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ७२५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४३४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. २८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २५ हजार ७४० रुग्णांची ( Corona Patients ) नोंद झाली आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Aug 3, 2022, 10:52 PM IST

मुंबई -मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ ( Increase in the number of corona virus patients ) झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. आज त्यात वाढ होऊन ४३४ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २१९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


४३४ नवे रुग्ण -मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ७२५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४३४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. २८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २५ हजार ७४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार १०६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८३१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२५ टक्के इतका आहे.


रुग्णसंख्या वाढली -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७, १९ जुलैला २८४, २० जुलैला २९०, २१ जुलैला २७३, २२ जुलैला २९९, २३ जुलैला २६६, २४ जुलैला २३८, २५ जुलैला १७६, २६ जुलैला २६३, २९ जुलैला २९०, ३० जुलै २८६, ३१ जुलैला ३२२, १ ऑगस्टला १६४, २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४ रुग्णांची नोंद झाली आहे.


११४ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात २ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Bengal Recruitment scam case: घोटाळ्यात अडकलेला पार्थ चॅटर्जी खायचा महिन्याला अडीच लाख रुपयांची फळे.. ईडीने केला खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details