मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्यासोबत गेले. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तेचा खेळ सुरू होता. उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर हे शक्य झाले नसते. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली यात त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
बाळासाहेब असते तर -यावेळी मुलाखतकाराने राज ठाकरे यांना 'शिवसेनेचे अपयश आपण पाहू शकता, बाळासाहेब असते तर आज अशी परिस्थिती असती का?' असा प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "नाही, ते शक्य नाही, त्यामुळे शिवसेनेकडे पक्ष किंवा संघटना म्हणून पाहू नका, ही एका विचाराने बनलेली जनता होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक कल्पना होती आणि त्या विचाराशी बांधील लोक होते. तोपर्यंत हाच विचार होता. त्यामुळेच बाळासाहेब असते तर ते शक्य झाले नसते.
याचे श्रेय कुणाला? -राज ठाकरे यांच्या उत्तरावर मुलाखतकाराने त्यांना 'मुळात ही परिस्थिती निर्माण झाली याचे श्रेय तुम्ही कोणाला देता? शिवसैनिक जबाबदार आहेत का? की भाजपने शिवसेना फोडली? शरद पवारांनी शिवसेना फोडली? असा प्रश्न विचारला तर राज ठाकरे म्हणाले की, "त्या दिवशी देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले. मी त्यांना म्हणालो, याचं श्रेय घेऊ नका, काय झालं.. जोरजोरात हसायला लागले. जे झाले ते तुम्ही केले नाही, ना अमित शहा, ना भाजप, ना अन्य कोणी.