मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर व कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी सरनाईक यांच्यावरील कारवाईचे स्वागत करताना शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. प्रताप सरनाईक यांनी कारवाईवर संताप व्यक्त करत ईडीने छापा टाकला म्हणून तोंड बंद करणार नाही असे म्हटले होते.
किरीट सोमैय्यांची सरनाईक यांच्यावर टीका
दरम्यान, प्रताप सरनाईक हे परदेशातून परतले असल्याने विलगीकरणात आहेत. त्यामुळे चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलावण्यात यावे अशी विनंती सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी सरनाईक यांच्यावर निशाणा साधत, काल सरनाईक यांनी भेट घेतलेल्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्वारंटाइन होण्यास सांगणार का? असा सवाल केला आहे.