मुंबई :वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प, महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. यावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वेदांतचा प्रकल्प राज्याबाहेर गेला, यावर आता आपल्याला काही टीका टप्पणी करायची नाही आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. जे यामध्ये राजकारण करतील त्यांचे मुखवटे फाटतील. तसेच, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढील काळात (Maharashtra state in future) वेदांत ग्रुप्सने राज्यामध्ये मोठी गुंतवणूक (Vedanta Groups tweet about bringing projects) करणार असल्याचेही, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.Vedanta Groups tweeted
ठाकरे सरकारमुळे प्रकल्प राज्याबाहेर : केवळ दोन महिन्यांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प अशाप्रकारे जाण्याचा निर्णय घेत नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही लगेचच वेदांत ग्रुप सोबत बैठक घेतली होती. त्यांना सबसिडी बाबत ऑफर देखील दिल्या. आणि प्रकल्प राज्यांमध्येच करावा, यासाठी प्रयत्न देखील केले होते. दीड-दोन महिन्यात असा मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला जात नाही. तेव्हाचे सरकार पाहून तो प्रकल्प राज्याबाहेर गेला.