महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Underworld Don Dawood Ibrahim पोलिसाचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन वाचा सविस्तर

दाऊदचे वडील इब्राहीम कासकर Ibrahim Kaskar मुंबई पोलिसांत कॉन्स्टेबल होते. डोंगरी नागपाडा भागामध्ये कॉन्स्टेबल इब्राहीम कासकरना Constable Ibrahim Kaskar मान होता. इब्राहीम कासकर आणि दाऊदची आई अमीना कासकर यांचे एकूण बारा मुलं होती. 19 वर्षांच्या दाऊदने Underworld Don Dawood Ibrahim भाऊ शब्बीर आणि आपल्या साथीदारांसोबत मुंबईतल्या कर्णाक बंदर भागामध्ये बँकेचे पैसे लुटले आणि गुन्हेगारी जगताचं आणि मुंबईतल्या वर्तमानपत्रांचंही लक्ष या तरुणाकडे गेलं

Dawood Ibrahim
दाऊद इब्राहिम

By

Published : Sep 1, 2022, 2:23 PM IST

मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworld don Dawood Ibrahim माहिती देण्यासाठी एनआयएने 25 लाखाची बक्षीस जाहीर आहे. 80 च्या दशकात गुन्हेगारी जगतात प्रवेश झाल्यापासून दाऊद कायमच चर्चा आणि वादांचा केंद्रबिंदू राहिला आहे. सातवीमध्ये शाळा सोडल्यानंतर दाऊदने परिसरातल्या टवाळ मुलांसोबत लहान चोऱ्यामाऱ्या, लोकांच्या गळ्यातल्या साखळ्या हिसकावणं, पाकिटमारी, मारहाण करण्यापासून ते आज अंडरवर्ल्डचा डॉन पर्यंत दाऊद इब्राहिमने Dawood Ibrahim आपले प्रस्थ वाढवले आहे.

बँकेचे पैसे लुटले -दाऊदचे वडील इब्राहीम कासकर Ibrahim Kaskar मुंबई पोलिसांत कॉन्स्टेबल होते. डोंगरी नागपाडा भागामध्ये कॉन्स्टेबल इब्राहीम कासकरना मान होता. इब्राहीम कासकर आणि दाऊदची आई अमीना कासकर यांचे एकूण बारा मुलं होती. 19 वर्षांच्या दाऊदने भाऊ शब्बीर आणि आपल्या साथीदारांसोबत मुंबईतल्या कर्णाक बंदर भागामध्ये बँकेचे पैसे लुटले आणि गुन्हेगारी जगताचं आणि मुंबईतल्या वर्तमानपत्रांचंही लक्ष या तरुणाकडे गेलं. हे पैसे हाजी मस्तानचे Haji Mastan आहेत असं समजून दाऊदने ही लूट केली. पण त्याने चोरलेले पैसे हे मेट्रोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह बँकेचे होते आणि हा मुंबईतला दशकभरातला सगळ्यात मोठा दरोडा होता. आपल्या मुलाचं कृत्य ऐकून इब्राहिम कासकरना धक्का बसला होता.


किशोरवयात डोंगरीतल्या गल्लीतल्या मुलांची गँग -दाऊदने वयाच्या अकराव्या वर्षापासूनच लोकांच्या गळ्यातल्या साखळ्या हिसकावणं, पाकिटमारी, मारहाण करणे अशा प्रकारे सुरू केल्या होत्या. किशोरवयात डोंगरीतल्या गल्लीतल्या मुलांची गँग तयार करणारा दाऊद विशीत येईपर्यंत पठाण गँगला आव्हान देऊ लागला होता. सातवीमध्ये शाळा सोडलेला हाच दाऊद पुढे मुंबईचा आणि नंतर भारतातला सगळ्यात मोठा डॉन बनला. दाऊदने त्याचा भाऊ शब्बीरसोबत स्वतच्या गटाच्या कारवाया करायला सुरुवात केली. मीडियाने याला नाव दिलं डी कंपनी दाऊदचा भाऊ अनीस आता या कंपनीसाठीचे सगळे व्यवहार सांभाळत असल्याचा माहिती आहे. दाऊद इब्राहिमवर ज्येष्ठ पत्रकार एस. हुसैन झैदी यांनी पुस्तक लिहिलंय. डोंगरी टू दुबई या पुस्तकामध्ये या प्रसंगाचं वर्णन करताना ते लिहितात इब्राहिमचं त्याच्या मित्रांचं आणि हितचिंतकांचं असं स्वतचं एक नेटवर्क होतं. त्यांच्यामार्फत त्याने दोन्ही मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.




डॉनचा जन्म - दाऊद चे वडील इब्राहिम याने दाऊदला शोधून काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात मारहाण देखील केले होते. दाऊदची आई अमीनाने या दोघांना अन्न-पाणी देण्यापूर्वीच इब्राहिमने त्यांना फरफटत घराबाहेर काढलं टॅक्सीत कोंबलं आणि क्राईम ब्रांचला आणलं. तिथल्या अधिकाऱ्यांच्या पायांवर आपल्या मुलांना घालत तो हात जोडून रडू लागला. मुलांनी केलेल्या लाजीरवाण्या कामाबद्दल त्याने अधिकाऱ्यांची माफी मागितली. दाऊद आणि शब्बीरची केविलवाणी अवस्था आणि इब्राहिमचा सच्चेपणा पाहत क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना स्वतःच्या मारातून सूट दिली. पुढे अशा अनेक घटना घडल्या जिथे दाऊदला आपोआप सूट मिळाली. पण रक्त सळसळवणारी ती एक घटना आणि त्यानंतर मिळालेली 15 मिनिटांची प्रसिद्धी इब्राहिमला भावली. कदाचित याच घटनेने दाऊद इब्राहिममधल्या डॉनला जन्म दिला. अंडरवर्ल्डमध्ये दाऊदच्या प्रवेशामुळे तिथल्या तेव्हाच्या प्रस्थापितांच्या वर्चस्वाला धक्का बसला आणि गँगवॉरला आणि रक्तपाताला सुरुवात झाली.



1993 बॉम्बस्फोट मास्टरमाइंड -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने मुंबईमध्ये अनेक गुन्हे दाखला आहे. दाऊद मुंबई बाहेर असला तरी खंडणी, सोन्याची तस्करी, धमकी देणे यासह अनेक प्रकरणांमध्ये दाऊद इब्राहिम मुंबई दाखला आहे. मुंबई 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मध्ये देखील दाऊद इब्राहिम हा मास्टरमाइंड होता. त्यानंतर मुंबई झालेल्या साखळी लोकल मधील पासपोर्टमध्ये देखील दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे माहिती उघड झाली होती. मुंबई तसेच भारतातील अनेक दहशतवादी कार्यामध्ये दाऊदचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती तपास यंत्रणेकडे आहे.


दहशतवादी कारवाया अंतर्गत गुन्हा दाखल -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून फरार म्हणून घोषित केले आहे. चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दाऊद इब्राहिम यांच्या संबंधातील सर्व तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर दाऊद इब्राहिम यांच्या विरोधात एनआयएने दहशतवादी कारवाया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर तपासणी यंत्राने मुंबईमध्ये मार्च महिन्यामध्ये 13 ठिकाणी छापेमारी केली होती. त्या छापेमारी दरम्यान तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे पुरावे देखील हाती लागले होते.





हेही वाचा -Amit Shah visit Mumbai : गणेशोत्सवादरम्यान अमित शाह मुंबईत, BMC Election अनुषंगाने दौरा महत्त्वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details