मुंबई- आमच्या व्यवसायावर नामुष्की ओढवली आहे. हिंदुत्ववादी शक्तींनी संपूर्ण व्यवस्था हातात घेतली आहे. पुनाळेकर त्याचेच उदाहरण आहे, असा आरोप प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
हिंदुत्ववादी शक्तींच्या हातात संपूर्ण व्यवस्था , पुनाळेकर त्याचेच उदाहरण - अॅड. सदावर्ते
पुनाळकर, हत्येसारख्या गुन्ह्यात सहभागी आहे, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करणार कोण हा प्रश्न आहे.
प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते
दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये पुनाळकर याचे नाव आहे. पुनाळेकर, हत्येसारख्या गुन्ह्यात सहभागी आहे, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करणार कोण हा प्रश्न आहे. पण संघर्ष मात्र चालू ठेवावा लागेल अन्यथा हे लोक हे संविधान नेस्तनाबूत करतील, असा आरोपही सदावर्ते यांनी केला.
Last Updated : May 27, 2019, 9:27 AM IST