महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीत गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गल्लोगल्ली पोलीस तैनात

झोपडपट्टी तसेच बाजार परिसरात काही केल्या गर्दी कमी होताना दिसत नाही. लोक मोठ्या संख्येने बाजारात अनावश्यक गर्दी करत आहेत. सरकारच्या व पोलिसांच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळत नाही.

police
धारावीत गर्दी टाकण्यासाठी प्रत्येक गल्लोगल्ली पोलीस तैनात

By

Published : Apr 2, 2020, 2:38 PM IST

मुंबई - झोपडपट्टी तसेच बाजार परिसरात काही केल्या गर्दी कमी होताना दिसत नाही. लोक मोठ्या संख्येने बाजारात अनावश्यक गर्दी करत आहेत. सरकारच्या व पोलिसांच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळत नाही. परिणामी कोरोनापासून बचावासाठी होत असलेल्या सूचनांचे कोणाकडूनही पालन होत नसताना मुंबईत रहिवासी भागात तसेच बाजारात गर्दी दिसत आहे. त्यामुळे पोलिसांपुढे गर्दीवर नियंत्रण मिळवणं मोठं आवाहनात्मक आहे.

धारावीत गर्दी टाकण्यासाठी प्रत्येक गल्लोगल्ली पोलीस तैनात
या पार्श्वभूमीवर धारावी खांबादेव येथे राऊंडअपसाठी पोलीस गेले असता, तरुणांनी दगडफेक केली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना दुर्दैवी आहे. जे याला जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी यावर कठोर पाऊले म्हणून अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, नागरिकांनी सहकार्य करा, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले. तसेच, कालपासून धारावी परिसरात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावी माहीम या वस्तीतल्या भागात लोकांना आवाहन करूनही लोकं बाहेर पडत आहेत त्यामुळे शाहूनगर येथे काही इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेच धारावीत वस्तीतील लोक अनेकदा सांगूनही अनावश्यकरीत्या आपल्या घरच्या बाहेर गर्दी करत आहेत. त्यामुळे धारावीतील चौका चौकात आणि गल्ल्या-गल्ल्यांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details