मुंबई :राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीहून 12 टक्के पाऊस अधिक आहे. त्यात मराठवाड्यात 32 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच हवामान विभागाकडून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात दि. 25, 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या दिवशी काही भागात रिपरिप पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.