मुंबई- राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. आज राज्यात १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५९ हजार १६६ झाली आहे. आज कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४ नमुन्यांपैकी १ लाख १६ हजार ७५२ नमुने पॉझिटिव्ह (१६.६५ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध आहेत. सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही मंत्री टोपे म्हणाले.
राज्यात ११४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू
ठाणे-७८ (मुंबई ७७, मीरा भाईंदर १), नाशिक- ११(जळगाव ७, नंदूरबार २, मालेगाव २), पुणे- २२ (पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १), लातूर-२ (लातूर २), अकोला-१ (यवतमाळ १).आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत, तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहेत. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये (७३.७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५६५१ झाली आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई - बाधीत रुग्ण- (६१,५८७), बरे झालेले रुग्ण- (३१,३३८), मृत्यू- (३२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,९९७)
ठाणे- बाधीत रुग्ण- (२०,१६७), बरे झालेले रुग्ण- (८५९१), मृत्यू- (६४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,९३३)
पालघर - बाधीत रुग्ण- (२६९१), बरे झालेले रुग्ण- (९२२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६८७)
रायगड- बाधीत रुग्ण- (२०६७), बरे झालेले रुग्ण- (१३२०), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५९)
रत्नागिरी - बाधीत रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४)
सिंधुदुर्ग - बाधीत रुग्ण- (१५८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
पुणे - बाधीत रुग्ण- (१३,२५०), बरे झालेले रुग्ण- (७४१०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२३०)
सातारा - बाधीत रुग्ण- (७८३), बरे झालेले रुग्ण- (४९१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७)
सांगली - बाधीत रुग्ण- (२६७), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
कोल्हापूर - बाधीत रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (६१५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११)
सोलापूर - बाधीत रुग्ण- (१९९०), बरे झालेले रुग्ण- (७०२), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०४)
नाशिक - बाधीत रुग्ण- (२१८८), बरे झालेले रुग्ण- (१३१४), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४०)
अहमदनगर - बाधीत रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
जळगाव - बाधीत रुग्ण- (१९३६), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८०)
नंदूरबार - बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)