मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनतर सत्र न्यायालयाकडून रितसर जामीन मंजूर करण्यात आलेला असतानाही आरोपीविरोधात लुक आऊट नोटीस काढणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना उच्च न्यायालयाने चांगलंच धारेवर ( HC slams central probe ) धरलं. कोणत्या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणांनी ही नोटीस बजावली ? असा थेट सवाल करत सीबीआय आणि ईडी संसदेच्या वरचढ आहेत का ? असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती मिलिंद गडकरी यांच्या खंडपीठाने सीबीआय व ईडीला ( look out notice after accused gets bail ) केला.
Yes Bank scam : येस बँक घोटाळ्यातील आरोपीला जामीन मिळाल्यानंतर लुक आऊट नोटीस काढणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना न्यायालयाने फटकारले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनतर सत्र न्यायालयाकडून रितसर जामीन मंजूर करण्यात आलेला Yes Bank scam accused gets bail असतानाही आरोपीविरोधात लुक आऊट नोटीस काढणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना उच्च न्यायालयाने चांगलंच धारेवर HC slams central probe धरलं.
न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतरही सीबीआय आणि ईडीनं लुक आऊट नोटीस जारी केलीयेस बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सत्र न्यायालयानं वेगवेगळ्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला ( Yes Bank scam accused gets bail ) आहे. मात्र असं असतानाही सीबीआय आणि ईडीनं रोशनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतरही सीबीआय आणि ईडीनं तिच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या नोटीसीविरोधात रोशनी कपूरनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ( Roshni Kapoors plea for look out notice ) आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.
सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूबजर आरोपीला यापूर्वी अटक झाली आहे, तर त्याच्याविरोधात पुन्हा लुक आऊट नोटीस का काढण्यात आली ? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. त्यावर अनेकदा आरोपी जामिनाच्या अटींचे उल्लंघन करून फरार होतात म्हणून ही नोटीस बजावण्यात आली आहे. असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला. मात्र खंडपीठानं ईडीच्या युक्तिवादावर असमाधान व्यक्त केलं. जेव्हा आरोपीला जामीन मंजूर होतो तेव्हा तो आरोपी त्या न्यायालयाच्या ताब्यात असतो. मग तुम्ही त्या न्यायालयाच्याही वर आहात का ? की तपासयंत्रणा संसदेच्या वरती आहेत ? असा सवालही उच्च न्यायालयाने तपासयंत्रणांना विचारला. तसेच जर आरोपीनं परदेशात जाण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला, तर तपास यंत्रणेनं तिथे बाजू मांडायला हवी होती. असं निरीक्षणही नोंदवत उच्च न्यायालयाने सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. ( Yes Bank scam )