महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Har Har Mahadev Trailer Released : पंचभाषिक ‘हर हर महादेव’ प्रेक्षकांसोबत साजरी करणार दिवाळी, ट्रेलर झाले प्रदर्शित

हर हर महादेव (Har Har Mahadev movie) चित्रपटाने (trailer has been released) अंगावर शहारा आणणारे लढाईचे दृश्य आणि त्याच्या जोडीला त्याच ताकदीच्या संवादांनी विस्मयकारक अनुभव दिल्याच्या प्रतिक्रिया अनेकजण समाजमाध्यमांवर देत आहेत. झी स्टुडियोजच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबरला (Har Har Mahadev movie is going to release on October 25) भारतभरात प्रदर्शित होणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.Har Har Mahadev Trailer Released

By

Published : Oct 12, 2022, 2:22 PM IST

Har Har Mahadev Trailer Released
हर हर महादेव चित्रपट

मुंबई : झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev movie) या चित्रपटाच्या (Har Har Mahadev movie is going to release on October 25) ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. अवघ्या काही तासांतच लाखो व्ह्युज मिळवत ट्विटरवरही ट्रेंड (trailer has been released) मिळवला. सुबोध भावे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची करारी बाण्याची भूमिका आणि दमदार व्यक्तिमत्व असलेल्या शरद केळकर यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेचं दर्शन या ट्रेलरमधून होत असून; या दोन्ही अभिनेत्यांना प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. Har Har Mahadev Trailer Released

हर हर महादेव


ट्रेलरने केली धमाल :हा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रथम क्रमांकावर ट्रेंड होत, तो वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला. केवळ मराठीच नाही तर इतर भाषांतील ‘हर हर महादेव’च्या ट्रेलरलाही असाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्युबवर अवघ्या काही तासांतच वीस लाखांच्यावर व्ह्युज मिळाले असून ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड करण्यात यशस्वी झाला. तामिळ चित्रपटसृष्टीत मक्कल सेल्वन म्हणजे सामान्य लोकांचा नायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार विजय सेथुपती यांनीही या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर आपल्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला, जो अनेक जणांनी रिट्विटही केला आहे.


भूमिकेबाबत समर्पित : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे म्हणाले की, 'हे स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं माझं मत आहे. बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो होतो, स्ट्रगल करत होतो. त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं.'

भूमिका माझ्यासाठी खूप खास : तर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारणारे अभिनेते शरद केळकर म्हणाले, 'माझ्या कारकिर्दीमधला हा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट आहे असं मी मानतो. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं. मी स्वतःला कायम छत्रपतींचा मावळा समजतो. त्यामुळे बाजीप्रभूंची ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या भूमिकेमुळे मला मराठी चित्रपटांमध्ये एक नवी ओळख मिळेल, असा विश्वास आहे.'



नातं होतं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं :हर हर महादेव चित्रपटाच्या कथेबद्दल लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वाचा विचार करताना मला एका गोष्टीचं कायम कुतुहल वाटायचं की, महाराजांमध्ये नेमकी अशी काय गोष्ट होती ज्यासाठी हजारो मावळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्यासाठी लढायचे. यावर अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती ही की, हे केवळ एक राजा आणि त्याचं सैनिक एवढंच नातं नव्हतं. हे नातं होतं माय माऊलीचं आणि तिच्या लेकराचं, हे नातं होतं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं, हे नातं होतं प्रभू श्रीराम आणि हनुमानाचं. महाराजांच्या व्यक्तिमत्वातली हीच गोष्ट मला भावली. ‘हर हर महादेव’ ही केवळ लढाई किंवा पराक्रमाची गोष्ट नाहीये तर ती जाणत्या राजाचं त्याच्या रयतेवर, शिलादारांवर असलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची गोष्ट आहे. या भावना वैश्विक आहेत त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना मनापासून भावेल, असा विश्वास मला आहे.'



पाच भाषांमध्ये भारतभर होणार प्रदर्शित :सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे. Har Har Mahadev Trailer Released

ABOUT THE AUTHOR

...view details