मुंबई - जर्मन नौदलाची फ्रिगेट बायर्न, F217 ही युद्धनौका आज मुंबईत ( German Warship Arrived Mumbai ) दाखल झाले आहे. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे प्रोटोकॉल, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले.
जर्मन नौदलाच्या युध्दनौकेचे स्वागत होणे ही सन्मानाची बाब - आदित्य ठाकरे
येथे जर्मन नौदलाचे स्वागत होणे ही सन्मानाची बाब आहे, दोन्ही देशांमधील संबंध खूप चांगले आहेत. स्वातंत्र्य, लोकशाही आणि स्थिर सागरी मार्गांचा संदेश जगभर पोहोचवणे देश म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -List of Popular CMs : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये उद्धव ठाकरेंनी पटकावलं स्थान