मुंबई -मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या ( Mumbai Corona ) वाढत असताना जून महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात मलेरिया, डेंग्यू ( Dengue ), गॅस्ट्रोचे ( Gastrology ) रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनासह पावसाळी आजारांनी डोकेवर काढले आहे. यामुळे पालिकेच्या ( BMC Health Dept ) आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवली आहे.
आजार वाढले -जून महिन्यापासून पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग व कीटक नाशक विभाग यांच्याकडून काळजी घेतली जाते. मुंबईत अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. पावसाला सुरुवात होण्याच्या आधीच जून महिन्याच्या पहिल्या ५ दिवसांत मलेरियाचे ५७, गॅस्ट्रोचे ७८ तर कावीळचे १५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आढळून आलेल्या गॅस्ट्रोच्या रुग्णांपैकी वांद्रे पूर्व-पश्चिम व भायखळ्यात गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून वरळी, प्रभादेवी परिसरात मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत.