महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट; . . अखेर सायन स्मशानभूमीतील गॅस दाहिनी 5 महिन्यानंतर सुरू

सायन स्मशानभूमीमधील गॅस दाहिनी गेले 5 महिने बंद होती. दोन दिवसांपूर्वी ही दाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर यापुढे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

By

Published : Apr 19, 2020, 7:17 PM IST

Updated : Apr 19, 2020, 7:25 PM IST

Sion
गॅस दाहिनी

मुंबई- शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून वरळी, भायखळा, धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीच्या हॉटस्पॉटपासून सायन स्मशानभूमी जवळ आहे. याठिकाणची गॅसवर चालणारी दाहिनी 5 महिन्यापासून बंद होती. मात्र आता ही दाहिनी सुरू झाल्याने कोरोना बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे सोपे झाले आहे.

कोरोना इफेक्ट; . . अखेर सायन स्मशानभूमीतील गॅस दाहिनी 5 महिन्यानंतर सुरू

मुंबईमध्ये 2500 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामधील 100 हुन अधिक रुग्ण धारावीत आहेत. तसेच सायन विभागातही रुग्ण आहेत. धारावीत आतापर्यंत 11 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास तो मृतदेह जाळावा किंवा योग्यरित्या पुरण्यात असा नियम आहे. धारावीमधील कोरोना झालेल्या बाधितांचे दोन मृतदेह सायनच्या स्मशानभूमीत आणण्यात आले होते. मात्र गॅस दाहिनी बंद असल्याने हे मृतदेह दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क आणि दादर पूर्व येथील भोईवाडा स्मशानभूमीत पाठवण्यात आले होते.

सायन स्मशानभूमीत विद्युत दाहिनी होती. दीड वर्षांपूर्वी ही दाहिनी गॅस दाहिनी करण्यात आली. मात्र नोव्हेंबरपासून ही गॅस दाहिनी बंद ठेवण्यात आली होती. कंत्राटदार आणि अभियांत्रिकी सेवा विभागाच्या भांडणात ही दाहिनी गेले 5 महिने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता ही दाहिनी सुरू झाल्याने या विभागात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येणार आहेत.

5 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार


सायन स्मशानभूमीमधील गॅस दाहिनी गेले 5 महिने बंद होती. दोन दिवसांपूर्वी ही दाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या दाहिनीवर दोन दिवसात 5 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Last Updated : Apr 19, 2020, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details