महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gas Cylinder leak At BDD Chawl : वरळी बीडीडी चाळीत गॅस गळती, २ महिला गंभीर

वरळी बीडीडी चाळीतील एका घरात एचपी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली. या आगीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एका महिलेला कस्तुरबा तर दुसरीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

By

Published : Apr 4, 2022, 8:38 PM IST

fire brigade
फाईल फोटो

मुंबई -वरळी बीडीडी चाळीतील एका घरात एचपी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली. या आगीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एका महिलेला कस्तुरबा तर दुसरीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दोन महिला जखमी - वरळी जांभोरी मैदान, जी. एम. भोसले मार्ग, बीडीडी चाळ नंबर ५५ मधील एका घरात आज सायंकाळी ४.३० वाजता हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या सिलिंडरमध्ये गॅस गळती झाली. गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीत दोन महिला जखमी झाल्या. जखमी पैकी सुनीता वंजारी (४७) ही महिला ७० ते ८० टक्के भाजली असून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर निशा पाटकर (४३) या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी सुनीता वंजारी या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

महापौरांनी केली विचारपूस - वरळी बीडीडी चाळ येथे सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक महिला मोठ्या प्रमाणात भाजल्याने तिला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर व माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details