मुंबई - उन्हाळ्याचे दिवस सर्वांना नकोसे वाटतात. उन्हातून फिरणाऱ्याला घामाच्या धारा, अशक्तपणा आदींचा सामना करावा लागतो. तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी दादरच्या बाजारात 'फूस-फूस' बॉटल आली आहे. तुम्ही या बॉटलच्या साहाय्याने एकाचवेळी पाणी पिऊ शकता आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा आणण्यासाठी 'फूस-फूस' अर्थातच पाणी स्प्रे करू शकता, अशी रचना या बाटलीची आहे.
उन्हाळ्यात थंडावा देणारी 'फूस-फूस' बॉटल बाजारात..
या बॉटलच्या साहाय्याने एकाचवेळी पाणी पिऊ शकता आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा आणण्यासाठी 'फूस-फूस' अर्थातच पाणी स्प्रे करू शकता, अशी रचना या बाटलीची आहे.
उन्हाळ्यात चेहरा घामाने माखला असेल तर चिंता करू नका कारण बाजारात फूस फूस करणारी २ इन १ बॉटल आली आहे. या बॉटलच्या स्प्रेचा वापर चेहऱ्यावर करू शकता. यामुळे उन्हाळ्यात चटका सहन करणाऱ्या चेहऱ्याला थंडावा मिळतो. त्यामुळे या बॉटलची मागणी वाढत आहे.
दादर येथील बॉटल विक्रेते आत्माराम नाईक म्हणाले, दररोज १२ ते १५ बोटलची हमखास विक्री होते. लोकांना या बॉटलचा फायदा कळू लागल्याने याची मागणी वाढत आहे. बाईक चालवण्याऱ्यासाठी ही बॉटल फायदेशीर आहे. २०० रुपये या बॉटलची किंमत असल्याचे त्यांनी सांगितले.