महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron In Mumbai : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ४ नवे रुग्ण, रुग्णांचा एकूण आकडा २३ वर

मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे ( Omicron Patient In Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले 4 प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या (Mumbai Omicron Patient Numbers) 23 झाली आहे. त्यापैकी 13 रुग्ण बरे झाल्याने ( Mumbai Omicron Patient Discharge ) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Omicron in Maharashtra
Omicron in Maharashtra

By

Published : Dec 19, 2021, 9:38 PM IST

मुंबई -मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Patient In Mumbai ) आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले 4 प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या (Mumbai Omicron Patient Numbers) 23 झाली आहे. त्यापैकी 13 रुग्ण बरे ( Mumbai Omicron Patient Discharge ) झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णांचा आकडा 23 वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून 9477 प्रवासी आले. त्यापैकी 28 प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. 1 नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात 55 प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील 15 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत 23 जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

हे चार रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह -

युके येथून औरंगाबाद येथे आलेली 21 वर्षीय महिला, युनायटेड किंगडम येथून दमन येथे आलेला 41 वर्षीय पुरुष, टांझानिया येथून आलेला कर्नाटकचा रहिवासी असलेला 57 वर्षीय पुरुष तसेच टांझानिया येथून आलेली कर्नाटकची रहिवासी असलेली 38 वर्षीय महिला, असे चार परदेशी प्रवासी आज ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आले आहेत.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

हेही वाचा -Amit Shah on Uddhav Thackeray :..तर राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details