मुंबई -मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे ( Omicron Patient In Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ४ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या (Mumbai Omicron Patient Numbers) १९ झाली आहे. त्यापैकी १३ रुग्ण बरे झाल्याने ( Mumbai Omicron Patient Discharge ) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- रुग्णांचा आकडा १९ वर -
मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून ९१०० प्रवासी आले. त्यापैकी २५ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ५० प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील १५ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत १९ जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
- हे चार रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह -
३२ वर्षीय केरळचा रहिवासी पुरुष साऊथ आफ्रिका येथून ६ डिसेंबरला रोजी मुंबईला आला. ११ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने फायझर लसीचा एक डोस घेतला होता. ३१ वर्षीय जळगावचा रहिवासी पुरुष साऊथ आफ्रिका येथून ६ डिसेंबरला रोजी मुंबईला आला. ११ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ४८ वर्षीय छत्तीसगढचा रहिवासी पुरुष टांझानिया येथून ११ डिसेंबरला मुंबईला आला. ११ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने कोणत्याही लसीचे डोस घेतले नव्हते. ४९ वर्षीय युनाइटेड किंग्डमचा रहिवासी पुरुष लंडन येथून १२ डिसेंबरला मुंबईत आला. १२ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने एसट्राझेनेका लसीचे दोन्ही डोस घेतले होते. एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही. ओमायक्रॉन बाधित रुग्णांपैकी १३ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
- रुग्णांची संख्या २०० पार