महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLA Abhijeet Adsul : अडचणीच्या वेळी पक्ष मागे उभा राहिला नाही, माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची खंत

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पूत्र अभिजीत अडसूळ ( MLA Abhijeet Adsul on shivsena ) हे शिवसेनेशी नाराज असल्याचे दिसून आले आहे. अडचणीच्या काळात पक्षाने आपली विचारपूस ( MLA Abhijeet Adsul unhappy with shivsena ) देखल केली नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त ( MLA Abhijeet adsul news ) केली आहे.

MLA Abhijeet Adsul comment on shivsena
अभिजीत अडसूळ यांची शिवसेनेशी नाराजी

By

Published : Jul 7, 2022, 2:18 PM IST

मुंबई -अडचणीच्या वेळी पक्ष मागे उभा राहिला नाही. आजारात कोणी विचारपूस ( MLA Abhijeet Adsul on shivsena ) केली नाही. त्यामुळे, आमची नाराजी निश्चित आहे. त्या संदर्भात ठाकरे यांना पत्र पाठवले असल्याची माहिती माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ ( MLA Abhijeet Adsul unhappy with shivsena ) यांनी दिली. अडचणीच्या वेळी आपली साधी विचारपुसही न केल्याच्या कारणावरून नाराज असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Former MP Anandrao Adsul ) यांनी शिवसेना नेतेपदाचा ( Shiv Sena leader ) राजीनामा ( Resigned ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडे पाठवला होता. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह ३९ आमदारांनी बंड केल्यानंतरही जिल्हात सेनेचा गड मजबूत होता. परंतु, माजी खासदार अडसूळ यांच्या राजीनाम्याने खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. अडचणीच्या वेळी पक्ष मागे उभा राहिला नसला असे सांगत आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार अभिजीत अडसूळ

हेही वाचा -'अरे संदीपान भूमरेंनी तर मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातलं होत, पाहिजे तर CCTV फुटेज देतो' - संजय राऊत

ईडीमार्फत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची चौकशी होत होती. त्यावेळी पक्षातील कोणीही सोबत उभे राहिले नाही. वरिष्ठांनी विचारपूसही केली नाही. त्यानंतर जेव्हा अडसूळ आजारी पडले तेव्हा त्यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तरीही पक्षातील वरिष्ठांनी विचारपूस केली नाही. याची निश्चितच खंत आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, ते शिवसेनेतच आहेत. आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही कोणताही गट वगैरे मानत नाही, असेही अडसूळ यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी आम्हाला अनेकदा मदत केली आहे. एकनाथ शिंदे सांगतील त्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत. मात्र, आम्ही शिवसैनिकच आहोत, असे पुन्हा एकदा अडसूळ यांनी स्पष्ट केले.

९८० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात ईडीने दिले होते समन्स -सिटी सहकारी बँकेच्या ९८० कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) चौकशीचे समन्स बजावले होते. तसेच, त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने छापे टाकले होते.

काय आहे प्रकरण -आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबर 2021 ला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना 'ईडी'ने समन्स पाठवले होते. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर ‘ईडी’ने त्यांना ताब्यात घेतले होते.

कर्ज वाटपात अनियमिततेचा आरोप -आमदार रवी राणा या प्रकरणी तक्रार केली होती. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली, पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

आनंदराव अडसूळ पाचवेळा होते खासदार -शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे पाच वेळा खासदार होते. 2009 मध्ये आनंदराव अडसूळ हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014 च्या निवडणुकीतही त्यांना अमरावती मतदारसंघातून यश मिळाले होते. त्यापूर्वी सलग तीन वेळा ते बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत मात्र अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला होता.

हेही वाचा -Heavy rain in Vasai-Virar : वसई विरारमध्ये मुसळधार; शाळांना सुट्टी, वाहतूक ठप्प, रस्ते पाण्याखाली

ABOUT THE AUTHOR

...view details