मुंबई :माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik PMLA case ) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. मनी लाँड्रिग ( Money Laundering case of Nawab Malik ) प्रकरणांमध्ये फेब्रुवारी मध्ये ईडी कडून अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणे कडून कुठलेही सबळ पुरावे देण्यात आले नसल्यामुळे मला जामीन मिळावा अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जात करण्यात आली आहे.
टेरर फंडिंग असल्याचा आरोप: मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते पैसे दाऊदला दिले. असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी मलिक यांना अटक केली. तेव्हापासून म्हणजे पाच महिन्यापासून मलिक न्यायालयीन कोठडीमध्येच आहेत. ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. आतापर्यंत तपास यंत्रणे कडून कुठलेही सबळ पुरावे दिले नसल्याने, जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला 15 जुलै पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
३ एकर जमीन खरेदीचा आरोप : नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर ( Hasina Parkar land sale ) हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.