महाराष्ट्र

maharashtra

Shivaji Park Dadar : आदित्य ठाकरेंना धक्का; शिवाजी पार्कमधील ड्रीम प्रोजेक्ट लांबणीवर

मुंबई महानगरपालिकेने दादर छत्रपती शिवाजी पार्कच्या ( Dadar Chhatrapati Shivaji Park beautification ) सुशोभिकरणासाठी ४ कोटी ७ लाख २४ हजार ४१६ रूपयांची निविदा काढली होती. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेणखत युक्त लाल माती, गवत लावणे, एतिहासिक प्यायूचे सुशोभिकरण करणे यासारखी कामे अपेक्षित होती. या मैदानात ४५० ट्रक अतिरिक्त लाल मातीमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याने याला विरोध करण्यात येतो आहे.

By

Published : Jul 20, 2022, 8:14 PM IST

Published : Jul 20, 2022, 8:14 PM IST

शिवाजी पार्क दादर
शिवाजी पार्क दादर

मुंबई - मुंबई महानगरपालिकेत गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या कालावधीत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) यांनी दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील सुशोभीकरणाचे काम सुरु केले होते. या कामाला शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी पार्क येथील प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प लांबण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध :मुंबई महानगरपालिकेने दादर छत्रपती शिवाजी पार्कच्या ( Dadar Chhatrapati Shivaji Park beautification ) सुशोभिकरणासाठी ४ कोटी ७ लाख २४ हजार ४१६ रूपयांची निविदा काढली होती. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेणखत युक्त लाल माती, गवत लावणे, एतिहासिक प्यायूचे सुशोभिकरण करणे यासारखी कामे अपेक्षित होती. या मैदानात ४५० ट्रक अतिरिक्त लाल मातीमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याने याला विरोध करण्यात येतो आहे. येथील रहिवाशांनी मैदान समतल करण्याकरीता वापरण्यात आलेल्या माती भरावामुळे भविष्यात धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात उदभविण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच धुळ उडण्यास प्रतिबंध करण्यासाठी लागवड करण्यात आलेल्या गवताबाबत सुध्दा विरोध दर्शविला आहे.


रेन वॉटर हार्वेस्टींगबाबत सांशक :नव्याने तयार करण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणेच्या उपयोगितेबाबतही साशंकता व्यक्त केलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवाजी पार्कचे स्थानिक रहिवाशी व जी/उत्तर विभागाच्या अधिका-यांसोबतच्या बैठकीत या प्रकल्पाची तांत्रिक पडताळणी करण्याचे निश्चित झाले आहे. शिवाजी पार्कचे स्थानिक रहिवाशी, सदर प्रकल्पाचे तज्ज्ञ सल्लागार, रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणेशी संबंधित तज्ञ सल्लागार तसेच महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ सल्लागार यांची कोअर कमिटी स्थापन करण्याचे ठरले आहे. समितीच्या सल्ल्याच्या उपाययोजना जोवर स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.


शिवाजी पार्क येथील प्रकल्प आहे तरी काय ? :मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणाची ४ कोटी ७ लाख २४ हजार ४१६ रूपयांची निविदा काढली होती. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेणखत युक्त लाल माती, गवत लावणे, एतिहासिक प्यायूचे सुशोभिकरण करणे यासारखी कामे अपेक्षित होती. या मैदानात ४५० ट्रक अतिरिक्त लाल मातीमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तसेच आगामी ३ वर्षांसाठी २ कोटी ९९ लाख रूपयांचा खर्च हा पाणी मारणे, गवत लावणे, सुरक्षा आदी कारणासाठी देण्यात येणार होता. त्यामध्ये ३६५ दिवसांपैकी १९८ दिवस काम हे कंत्राटदाराला मिळणार होते. त्यामुळे दिवसाला ५० हजार रुपये फक्त पाणी मारण्यापोटी खर्च होणार होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क कृती समितीने ही निविदा प्रक्रिया रद्द साठी केलेल्या पाठपुरावामुळे ही निविदाच रद्द झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत ईडी चौकशीला गैरहजर; वेळ वाढवून मागितला

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details