महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती करणार, कौशल्य विकास मंत्र्यांची ग्वाही

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे (75 year of independence) या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार मार्फत सुमारे पाच लाख रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे (Five lakh jobs will be created). कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे (Skill Development Minister Mangal Prabhat Lodha). मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे निकिता टाटेर यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

By

Published : Sep 12, 2022, 4:44 PM IST

Updated : Sep 12, 2022, 9:01 PM IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती करणार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती करणार

मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील सुमारे पाच लाख युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे ((75 year of independence)). राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. मुंबईत एका प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.

टाटेर यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन -भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार मार्फत सुमारे पाच लाख रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे ((Five lakh jobs will be created)). कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे निकिता टाटेर यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निकिता ताटेर यांनी यापूर्वी दुबई, न्यूयॉर्क येथे भरवलेल्या चित्रप्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईत चित्र प्रदर्शन आयोजित केले. त्यांचे भविष्य उज्वल आहे असेही लोढा म्हणाले ((Skill Development Minister Mangal Prabhat Lodha)).

युवकांच्या कलागुणांना वाव देणार -राज्यातील युवकांच्या कलागुणांसाठीही आपल्या विभागामार्फत आपण वाव देणार आहे. त्यासाठी लवकरच आम्ही आराखडा तयार करीत आहोत असेही मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. कोरोना काळानंतर युवकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे अशा युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती वेगवेगळ्या क्षेत्रात करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्र्यांची ग्वाही

गुजराती समाजाने मदत करावी -राज्यात जर पाच लाख रोजगार निर्मिती करायची असेल तर केवळ सरकारने काम करून चालणार नाही. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी ही मदत केली पाहिजे. गुजराती समाजाने यासाठी पुढे यावे आणि रोजगार निर्मितीच्या कामात सरकारला सहकार्य करावे तर हे शक्य होईल अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.

Last Updated : Sep 12, 2022, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details