मुंबई - पुण्यात येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे ( Pune Building Slab Collapse ) त्यात पाच मजुरांचा मृत्यू ( Five Workers Died In Building Slab Collapse ) झाला. मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांसाठी राज्य सरकारने पाच लाख रुपये मदत म्हणून घोषित केली आहे. पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून, या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या मजुरांना पाच लाख रुपये मदत घोषित ( Compensation In Building Slab Collapse Case ) केली. ट्विट करून उपमुख्यमंत्र्यांनी ही मदत जाहीर केली.
Pune Building Slab Collapse : स्लॅब कोसळून मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत
पुण्यात येरवडा भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून ( Pune Building Slab Collapse ) पाच मजुरांचा मृत्यू झाला ( Five Workers Died In Building Slab Collapse ) होता. या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली ( Compensation In Building Slab Collapse Case ) आहे.
त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या घटनेनंतर दुःख व्यक्त केलं. निर्मनाधिन इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे पाच मजुरांचा झालेल्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षता पाळली जावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी बांधकाम होत असलेल्या ठिकाणच्या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. तसेच या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्यावर कडक कारवाईचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
TAGGED:
Pune Building Slab Collapse