महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुका EVM वरच होणार असे सांगितले असल्याने, येत्या सोमवारी 21 ऑक्टोबरला राज्यातील ८ कोटी ९५ लाख मतदार ईव्हीएमद्वारे आपला मताधिकार बजावतील. अनेक पक्ष आणि उमेदवारांनीही विरोध केलेले, हे EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय? याचा ईटीव्ही भारतने बनवलेला हा स्पेशल रिपोर्ट...

ईव्हीएम बद्दल जाणूया

By

Published : Oct 19, 2019, 2:30 PM IST

Updated : Oct 19, 2019, 2:47 PM IST

मुंबई -महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यातील निवडणूका ईव्हीएमऐवजी ब‌ॅलेट पेपरवर व्हाव्यात यासाठी अनेक पक्षांनी प्रयत्न केले. मात्र निवडणूक आयोगाने अखेर EVM वरच आपली मोहोर उमटवली. सोमवारी राज्यातील ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार या दिवशी आपले मतदान करणार आहेत. एकूण ९५,४७३ मतदान केंद्र आणि १.८ लाख ईव्हीएम मशीन यांच्या माध्यमातून हि प्रक्रीया पार पडणार आहे.

VVPAT आणि ब‌ॅलेट युनिट

ईव्हीएम (EVM) बद्दल जाणूया

'ईव्हीएम' म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन. पूर्वीच्या काळी मतदानासाठी असणाऱ्या मतपेट्या कालबाह्य होऊन आता मतदानासाठी आणि निकाल मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) या आधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येतो.

हेही वाचा... 'आचारसंहिता' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

ईव्हीएम वापराची सुरूवात

'ईव्हीएम'चा प्रस्ताव सर्वात अगोदर १९७७ मध्येच मांडला गेला होता. १९७९ मध्ये पहिल्यांदा 'ईव्हीएम' तयार करण्यात आले. ६ ऑगस्ट १९८०ला सर्वप्रथम 'ईव्हीएम'चे प्रात्यक्षिक सर्व पक्षांना दाखवण्यात आले. भारतात या प्रक्रियेला होत असलेला राजकीय विरोध, तंत्रज्ञान समजून घेण्याचा बाबतचे अज्ञान आदी कारणांमुळे हळूहळू देशभरात पूर्णपणे 'ईव्हीएम'वर मतदान प्रक्रियेचा अवलंब होण्यासाठी २०११ हे वर्ष उजडावे लागले.

ईव्हीएमचे कार्य कसे चालते?

'ईव्हीएम'चे प्रामुख्याने मुख्य तीन भाग असतात; पहिला बॅलेट युनिट (BU), दुसरा कंट्रोल युनिट (CU ), तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT). पुर्वी फक्त पहिल्या आणि दुसऱ्या भागाचाच वापर करण्यात येत असे. मात्र, निवडणूक निर्णयांबद्दल वाढता आक्षेप आणि विरोध पाहता, मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी 2010 नंतर 'व्हीव्हीपॅट'चा वापर करण्यास सुरूवात झाली

VVPAT आणि ब‌ॅलेट युनिट

काय आहे BU मशीन (बॅलेट युनिट)

बॅलेटि युनिटवर उमेदवारांची नावे, निवडणूक चिन्ह आणि एक बटण असते. सामान्य मतदार या बटणाचा वापर करून मत देतात. सर्व मतदारांचा प्राथमिक संपर्क फक्त याच मशिनसोबत येत असतो.

हेही वाचा... इव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण निर्णय, विश्वासार्हता वाढवण्याचा केला प्रयत्न

कंट्रोल युनिटचे महत्व

BU च्या अगोदरही CU म्हणजे कंट्रोल युनिट कार्यान्वयीत केले जाते. कंट्रोल युनिटवर काही बटण असतात. या छोट्या यंत्रावरील स्टार्ट किंवा बॅलेट नावाचे बटण दाबल्यानंतर मतदार आपले मत टाकू शकतो. प्रत्येक वेळी नवीन मतदार आला की, बॅलेट बटण निवडणूक कर्मचाऱ्यांकडून दाबले जाते. कंट्रोल युनिटवर एक 'स्टॉप' बटण असते. हे बटन निवडणूक प्रक्रिया संपल्यावर दाबले जाते. हे बटण दाबल्यानंतर एकही मत नव्याने टाकता येत नाही. कंट्रोल युनिटवरच 'रिजल्ट' नावाचे बटन असते. मतदान चालू कण्यापूर्वी ते बटन सील केले जाते. यानंतर जेव्हा मतमोजणी केली जाते तेव्हाच वापरले जाते. ते बटण दाबल्यावर एक एक करून उमेदवाराचे नाव आणि त्याला, संबंधीत केंद्रावर मिळालेली मते दिसतात.

मतदान पारदर्शकतेसाठी वापरण्यात येणार VVPAT

व्हीव्हीपॅट हे मशीन म्हणजे एक प्रकारचा प्रिंटर म्हणता येईल, असे आहे. यात जेव्हा मतदार आपले मतदान करतो तेव्हा ते कोणत्या व्यक्तीला केल आहे. त्याबाबत एक छोटी पावती येते. यावरून मतदार आपण नेमके कोणाला मत दिले आहे, मत योग्य व्यक्तीलाच गेले आहे की नाही, याची खात्री करून घेऊ शकतो.

कंट्रोल युनिट आणि ब‌ॅलेट युनिट

हेही वाचा... प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! सभा, रॅली, पदयात्रेने होणार समारोप

'ईव्हीएम'ची निर्मिती कोठे होते?

देशात 'ईव्हीएम'ची निर्मिती दोन ठिकाणी करण्यात येते. एक म्हणजे 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' (बेल) आणि दुसरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल). या दोन्ही कंपन्या सरकारी मालकीच्या असून, 'ईव्हीएम' बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पडली जाते.

मतदानासाठी 'ईव्हीएम' सुरक्षित आहे का?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 'मत दिले एका उमेदवाराला परंतु ते जात होते दुसर्‍याच उमेदवाराला"असे व्हीव्हीपॅटमध्ये दिसल्याचे बोलले गेले, म्हणून काही ठिकाणी मतदारांनी रागाच्या भरात ईव्हीएम फोडले होते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येत EVM ह‌ॅक होते, अथवा ते अगोदरच सेट केले जाते, असे आरोप करत निवडणुका ब‌ॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने EVM वरच शिक्कामोर्तब केले. या अनुषंगाने मतदानासाठी 'ईव्हीएम' खरच सुरक्षित आहे, हे तपासले पाहिजे.

खरेतर जगात अशी एकही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही, की जी परिपूर्ण आहे, असे आपण म्हणू शकतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला कोणत्या ना कोणत्या प्रकारे धोका पोहोचवला जाऊ शकतो. 'ईव्हीएम'बाबतही असेच म्हटले जाऊ शकते. मात्र EVM च्या बाबत ब्लूटूथ उपकरणे किंवा अन्य कोणत्याही कोडिंगमध्ये फेरबदल केलेले उपकरण जोडण्यासाठी 'कंट्रोल युनिट'चा काही वेळ पूर्णपणे ताबा मिळणे गरजेचे आहे. परंतु EVM साहित्यांच्या बाबत जी काळजी आणि सुरक्षितता, पारदर्शकता भारतात बाळगली जाते, ते पाहता भारतात EVM हे सुरक्षीत असून ह‌ॅक होण्याचा संभव नाही. एका पक्षाला मत देण्यासाठी बटण दाबल्यावर ते दुसऱ्याच पक्षाला जात असल्याची तक्रार प्रत्येक मतदानात होतच असते. मात्र, त्यात तितकेसे तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने वेळोवेळी सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत घेतलेल्या चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे.

हेही वाचा... आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या ५ दिवसात ३ कोटींचा मुद्देमाल जप्त

भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक निवडणूक १९८२ मध्ये घेण्यात आली. केरळ राज्यातील उत्तर परवूर विधानसभा मतदारसंघात प्रयोगात्मक आधारावर त्याचा उपयोग केला गेला. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करून निवडणूक कायदेशीर करण्यासाठी जनतेच्या अधिनियम १९५१ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. २००४ पासून लोकसभा व नंतर विधावनसभा निवडणूकांत ईव्हीएमचा वापर करण्यात आला. तो आजतागायत सुरू आहे. अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. मात्र ईव्हीएम हॅक करणे अथवा त्याच्याशी छेडछाड निव्वळ अशक्य आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी 21 तारखेला संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान (EVM) होणार आहे. 288 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (Control units) सज्ज करण्यात आली आहेत. शिवाय 1 लाख 35 हजार 21 VVPAT (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत.

Last Updated : Oct 19, 2019, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details