मुंबई - मुंबई पोलिसांनंतर ईडी देखील आपल्या तपासाचा फास राज कुंद्रा याच्या भोवती आवळू शकते. ईडी राज कुंद्राच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि फेमा कायद्याअंतर्गत कधीही गुन्हा दाखल करु शकते, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. नियमांनुसार मुंबई पोलीस ईडीला या प्रकरणात अर्थिक गैरव्यवहाराच्या तपास करण्यास सांगू शकते. या प्रकरणात फॉरेन एक्सचेंज वॉयलेशन देखील आहे.
PMLA आणि FEMA अंतर्गत समन्स जारी होण्याची शक्यता
गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडी तपासाला सुरुवात करेल. मुंबई पोलिसांकडून एफआयआरची कॉपी घेईल. चौकशीच्या पूर्वी ईडी कुंद्राच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि फेमा अंतर्गत समन्स जारी करु शकते. सध्या कुंद्रा मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. कोर्टाने त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिल्पा शेट्टी मुंबई पोलिसांच्या रडावर?
मुंबई पोलीस राज कुंद्राच्या विरोधात पुरावे गोळा करत आहे. या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे देखील लागले आहेत. तसेच काही बँकेची खाती देखील मुंबई पोलीस खंगाळत आहे. यामध्ये पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या जॉईंट अकाऊंटबद्दल माहिती देखील मिळाली आहे.
पीएनबी बँकेच्या खात्याची होणार चौकशी -
पंजब नॅशनल बँकमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांचे जॉईंट आकाऊंड आहे. या खात्यातून मागच्या एका वर्षाच्या काळात करोडो रुपयांचे ट्रांजेक्शन झालं आहे. क्रामई ब्रांचला संशय आहे की, हॉटशूट आणि बॉलीफेम एप्पमधून मिळणारी कमाई या खात्यात जमा केली जात असे. दरम्यान, तपासात असं समोर आलं आहे की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हतं. तर थोड्या थोड्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर केले जात. 23 जुलै रोजी जेव्हा पोलीस शिल्पा शेट्टी हिच्या घरी गेले होते तेव्हा पोलिसांनी या संदर्भात शिल्पा शेट्टी हिला या खात्याबाबत विचारणा देखील केली असल्याचं कळतंय.
हेही वाचा -RAJ KUNDRA PORNOGRAPHIC CASE : अटकेच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी, शिल्पाची पुन्हा चौकशी?