महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 7, 2020, 7:22 PM IST

ETV Bharat / city

महिलांवरील अत्याचारात वाढ; विनयभंग, हुंडा बळींची संख्या घटली

राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात विनयभंग, हुंडाबळीच्या गुन्ह्यांची नोंद कमी असली तरी अपहरण, बलात्कार, लैंगिक अत्याचार आदी गुन्हे वाढल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.

economic-reports-show-increase-in-violence-against-women
महिलांवरील अत्याचारात वाढ; विनयभंग, हुंडाबळीची संख्या घटली

मुंबई - राज्यात दोन वर्षांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विनयभंग हुंडाबळीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, अपहरण आणि पळवून नेण्याचे प्रकार आणि पती व नातेवाईकांकडून करण्यात येत असलेल्या अत्याचारांची प्रकरणे वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल

राज्यात २०१८ वर्षाच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारांच्या विविध घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये बलात्कार, अपहरण, पती व नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या अत्याचारासोबत विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि अनैतिक व्यापार आदी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१८ मध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून ३५ हजार ४९७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात २०१९मध्ये वाढ होऊन ते ३७ हजार ५६७ इतके झाले आहेत. त्यात विनयभंग, हुंडाबळीच्या गुन्ह्यांची नोंद कमी असली तरी अपहरण, बलात्कार, लैंगिक अत्याचार आदी गुन्हे वाढल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यांची वाढ राज्यात चिंताजनक बनली आहे. २०१८मध्ये नोंद झालेल्या गुन्ह्याची संख्या ही ६ हजार ८२५ इतकी होती. त्यात २०१९मध्ये वाढ होऊन ८ हजार ३८२ वर पोचली आहे. पती आणि नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये आणि त्यासाठी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये नोंद झाली आहे.

गुन्ह्याचे प्रकार २०१८ २०१९
बलात्कार ४,९७४ ५,४१२
अपहरण ६,२४८ ८,३८२
नातेवाईक, पतीकडून झालेली क्रूरकृत्ये ६,८६२ ७,५६४
हुंडाबळी २०० १८७
लैंगिक अत्याचार १,१२७ १,०३३
इतर १,२३९ १,१७२
एकूण ३५,४९७ ३७,५६७

ABOUT THE AUTHOR

...view details