मुंबई - 'होळी लहान करा, पोळी दान करा' असा संदेश देत मुंबईत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याच्या वतीने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. नागरिकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
मुंबईतील अनेक गृहनिर्माण हौसिंग सोसायट्यांनी स्वतःहून होळी लहान करून होळीत पोळी न टाकता त्या जमा केल्या आणि महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवल्या. जमा झालेल्या पोळ्या दादरला आदिवासी कातकरी महिला, पारधी वाडी रे रोड, नायर रुग्णालय, टाटा हॉस्पिटल, करुणा हॉस्पिटल, भाईंदर, बोरिवली, दहिसर स्टेशनच्या बाहेर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहचवण्यात आल्या.
'होळी लहान करा, पोळी दान करा' म्हणत पर्यावरणपूरक होळी साजरी दहिसर शाखेचा दोन वर्षाचा चिमुकला कार्यकर्ता विहान हा सुद्धा पोळी वाटपात सहभाग घेतला. दहिसरची दहिवली सोसायटी, बोरिवलीची एलआयसी कॉलनी, मीरा रोडच्या सुंदरदर्शन, सुंदरनगर व सरस्वती धाम सोसायट्या, वरळीच्या बावन्न चाळ मधील कार्यकर्ते व आभा परिवर्तनवादी संघटना व योद्धा मित्र मंडळ यांनी वरळीतील मंडळासोबत एक घास आनंदाचा म्हणून पुरणपोळी गोळा करुन अंनिस कार्यकर्ते यांच्याकडे दिल्या. घाटकोपर भटवाडीतील दत्तकृपा मंडळ, बालमित्र मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, अखंड हरिनाम सप्ताह मंडळ या मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पोळ्या गोळा करून कार्यकर्त्यापर्यंत पोचवल्या.
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ
हेही वाचा - कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला; जिल्ह्यात पेटले पौर्णिमेचे होम