मुंबई - राज्यातील आरोग्य सेवेत डॉक्टरांची असणारी कमतरता भरुन काढण्यासाठी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर राज्यातील डॉक्टरांना आता लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे नियम लागू करणार. तसेच राज्याच्या आरोग्य सेवेत काम करण्याचे बंधन त्यांना करण्याचा निर्णय अभ्यासून घेण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया... येत्या तीन महिन्यात 900 पैकी 575 वैद्यकीय तज्ञांची भरती केली जाणार आहे, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले. राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या 1152 जागा रिक्त असून विशेषतः विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्यातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची २२२ पदे रिक्त आहेत.
पुढील तीन महिन्यात 900 पैकी 575 वैद्यकीय तज्ञांची भरती करणार - राजेश टोपे हेही वाचा...मराठा आरक्षणासंदर्भात आत्ता बोललो तर अडचणी निर्माण होतील - अजित पवार
विधानसभेतील या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले. त्यांनी डॉक्टरांच्या रिक्त पदांची समस्या मोठ्या प्रमाणात असून शासनाने प्रयत्न करूनही जागा रिक्त राहत आहेत. तसेच ग्रामीण भागात डॉक्टर काम करायला तयार नाही, अशी परिस्थिती असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित डॉक्टरांना कामावर ठेवण्यासाठी लष्करी महाविद्यालयाच्या धर्तीवर राज्याची वैद्यकीय सेवा बंधनकारक करण्याचा निर्णय घ्यावा, असे फडणवीस यांनी राज्य सरकारला सुचवले होते.