महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

RAJ KUNDRA PORNOGRAPHIC CASE शिल्पा शेट्टीने पोलिसांना 'हा' दिला जवाब

मुंबई पोलीस गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयातून त्याचा लॅपटॉप शुक्रवारी जप्त केला आहे. तसेच बँकेच्या स्टेटमेंटची माहितीही पोलिसांनी मिळविल्याचे सुत्राने सांगितले.

Shilpa Shetty
Shilpa Shetty

By

Published : Jul 25, 2021, 12:52 AM IST

Updated : Jul 27, 2021, 2:29 PM IST

मुंबई - पोर्नोग्राफिक गुन्हे प्रकरणात अटकेत मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली आहे. शिल्पा शेट्टीने हॉट अॅपपमधील कंटेन्टबाबत माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले.

मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफिक प्रकरणात १९ जुलैला अटक केली आहे. कुंद्रा हा पोर्नोग्राफिक सिनेमा आणि अॅपमधून पॉर्न सिनेमा करत असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे. त्याबाबबत भरपूर पुरावे असल्याचे यापूर्वीच मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा-महाडच्या दुर्घटनाग्रस्त तळीये गावचा म्हाडा करणार पुनर्विकास -जितेंद्र आव्हाड

अॅपमधील कंटेन्टबाबत माहिती नसल्याचा जवाब शिल्पा शेट्टींनी पोलिसांना दिला आहे. तसेच पतीच्या व्यवसायात हस्तक्षेप करत नसल्याचेही तिने सांगितले. सुत्राच्या माहितीनुसार, अॅपच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे अभिनेत्री शिल्पा पोलिसांना सांगितले आहे. कुंद्राच्या विवान इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पोलीस गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयातून त्याचा लॅपटॉप शुक्रवारी जप्त केला आहे. तसेच बँकेच्या स्टेटमेंटची माहितीही पोलिसांनी मिळविल्याचे सुत्राने सांगितले.

गुन्हे शाखेने शनिवारी कुंद्राच्या घरामधून काही साहित्य जप्त केले होते. या दरम्यान राजची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जवाब नोंदवला. यावेळेस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई पोलीसचे अधिकारीही उपस्थित होते. बियान कंपनीद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराबात तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

हेही वाचा-कोल्हापुराला पुराचा फटका: 7 जणांचा मृत्यू; 14 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने केली होती सोशल मीडियात पोस्ट

शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सोशल मीडियापासून स्वतःला दूरच ठेवले होते. राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. शिल्पाने पहिल्यांदाच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पुस्तकातील उतारा पोस्ट केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या उदाहरणाचा दाखला दिला आहे. यात लिहिलंय, "रागामध्ये असताना मागे वळून पाहू नका, किंवा घाबरुन पुढेही पाहू नका, तर जागरुक राहून पाहा."

पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "ज्यांनी आपले मन दुखावले आहेत अशा लोकांकडे आपण रागाने वळून पाहतो, जे नैराश्य आपण अनुभवलो आहोत, जे दुर्दैव आपण सहन केले. आपण आपल्या नोकर्‍या गमावण्याची शक्यता आहे याची आम्हाला भीती वाटते. हरवून जाण्याची, आजारपणाचा त्रास किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू याची भिती वाटत राहते. आम्ही ज्या जागी राहण्याची आवश्यकता आहे, ते हेच आहे, आता जे घडत आहे त्यात काय होऊ शकते, त्याला उत्सुकतेने पाहात नाही आहोत, तर पूर्णपणे जागरुक आहे याची पूर्णपणे जाणीव आहे.

हेही वाचा-Maharashtra Flood: राज्यात अतिवृष्टीमुळे 76 जणांचा मृत्यू, 59 जण अद्याप बेपत्ता, आतापर्यंत 90 हजार लोकांना वाचवले

Last Updated : Jul 27, 2021, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details