मुंबई - 'बकरी ईद' निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द-देवनार येथील पशुवधगृहात देशभरातून शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक बकरी तसेच जवळपास १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे पशुवधगृहात येणार असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी १० हजारांपासून ११ लाख ७८६ रुपयांचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
'बकरी ईद' स्पेशल : देवनार पशुवधगृहात ११ लाखांपर्यंतचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध
'बकरी ईद' निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द-देवनार येथील पशुवधगृहात देशभरातून बकरी दाखल झाली आहेत.
बकऱ्याची कुर्बानी देण्यासाठी मुस्लीम धर्मीयांकडून मुंबईत पालिकेच्या देवनार येथील पशुवधगृहात बकरे आणि मोठी जनावरे लिलावासाठी आणली जातात. सध्या पशुवधगृहात १० हजारांपासून ११ लाख ७८६ रुपयांचे बकरे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या बकऱ्यांच्या शरीरावर मुस्लीम धर्मीयांमध्ये पवित्र अशी अक्षरे आणि खुणा आहेत.
येत्या रविवारी (दि.११ ऑगस्ट) आणि सोमवारी (दि.१२ऑगस्ट) ला बकरी ईदनिमित्त या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मुस्लीम धर्मीय मोठ्या संख्येने पशुवधगृहात येतात. त्यासाठी पालिका आणि पशुवधगृह सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.