मुंबई -मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याची चर्चा समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात झळकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी खुर्चीवर बसण्यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेची बराच वेळ वाट पहात होते. अखेर फडणवीस यांनी त्यांना हाताला धरुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसविले. ही बाब सर्वांच्या लक्षात येताच, उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री कृती करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
मुख्यमंत्री शिंदे चर्चेत -महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत शिवसेना विरोधात एकनाथ शिंदे आणि बंड पुकारला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन यामुळे पायउतार व्हावे लागले. भाजपने सरकार अस्थिर झाल्याचे सांगत शिंदे गटासोबत राज्यात सत्तेवर आले. शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाली. विधानसभेत शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्यांनी केलेले भाषण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर केलेल्या कृतीने ते चांगलेच प्रकाश झोतात आले आहेत.
हेही वाचा -CM Eknath Shinde Takes Charge : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात पदभार स्वीकारला
फडणवीस यांनी बसविले खुर्चीवर-मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. त्यावेळी कुटुंबीय, आमदार आणि शिंदे गटाच्या समर्थकांचा गराडा होता. बराच वेळ खुर्चीत बसण्याची प्रतिक्षा करीत होते. बाजूला सरकारचे निर्माते उपमुख्यमंत्री फडणवीस असताना, मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या खुर्चीत कसे बसायचे, अशी अस्वस्थता शिंदे यांच्या हालचालीवरुन दिसून येत होती. ती अस्वस्थता, फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी हाताला धरुन शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसविले. टेबलावरील काही महत्वाची कागदपत्रे शिंदे यांच्या स्वाक्षरीसाठी फडणवीस यांनी सुपुर्द केले. त्यावर ही माध्यमांमधून चर्चा सुरु होती.