महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Pendrive bomb : देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात नवा पेन ड्राईव्ह बॉम्ब; 'वक्फ बोर्डाच्या सदस्याचा दाऊदशी संबंध'

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला ( Devendra Fadnavis Pendrive bomb ) आहे. या पेन ड्राइव्हच्या माध्यमातून त्यांनी वक्फ बोर्डाचे सदस्य स्वतःला कसे दाऊदचे संबंधित असल्याचे सांगतात आणि बॉर्डची कामे भागीदारीत करण्याबाबत कसे सांगतात ( Pendrive bomb about waqf board connection to Dawood ), हे त्यांनी सभागृहात मांडले.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Mar 14, 2022, 5:53 PM IST

Updated : Mar 14, 2022, 7:56 PM IST

मुंबई -विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला ( Devendra Fadnavis Pendrive bomb ) आहे. या पेन ड्राइव्हच्या माध्यमातून त्यांनी वक्फ बोर्डाचे सदस्य स्वतःला कसे दाऊदचे संबंधित असल्याचे सांगतात आणि बॉर्डची कामे भागीदारीत करण्याबाबत कसे सांगतात ( Pendrive bomb about waqf board connection to Dawood ), हे त्यांनी सभागृहात मांडले.

'वक्फ बोर्डाचा दाऊदची संबंध' - देवेंद्र फडणवीस

वक्फ बोर्डाचे सदस्य डॉक्टर मुदस्सीर लांबे आणि एक अर्शद खान नावाची व्यक्ती यांच्यात झालेल्या संभाषणाच्या चित्रफीत असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली आहे. यामध्ये मुदस्सर लांबे हे बोर्डाचे सदस्य आपण कशाप्रकारे दाऊद इब्राहिमशी संबंधित आहोत. हे या चित्रफितीमधील सांगता हेत सरकारने दाऊदशी संबंधित माणसाला कसे वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी बसवले असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले.

कोविड मृत्यूचा आकड्यापेक्षा दावे जास्त -

राज्य सरकारने कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी दावे दाखल करून घेतले. मात्र, राज्य सरकारकडे असलेल्या मृत्यूंच्या आकडा यापेक्षा दाव्यांची संख्या अधिक आहे. सरकारने मृत्यूची आकडेवारी लपवली का असा सवाल फडणवीस यांनी सभागृहात केला. राज्यात कुपोषण वाढत असून कुपोषणाची आकडेवारी पुन्हा वाढल्याने देशात कुपोषणाच्या बाबतीत राज्याचा १९ वा क्रमांक लागत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

रोजगार निर्मितीत कोणताही ठोस उपक्रम नाही -

हाफकिनला लस निर्मितीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली, कोणताही निधी दिला नाही अशी टीकाही फडणवीस यांनी सभागृहात केले. राज्य सरकारने पाणी रोजगार निर्मितीमध्ये कोणताही ठोस कार्यक्रम राबवला नाही. दहा हजार रोजगार सुद्धा उपलब्ध झाले नाहीत असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Tweet Of Nana Patole : नाना पटोले यांचा नवा 'ट्विट बॉम्ब', म्हणे पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचा

Last Updated : Mar 14, 2022, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details