महाराष्ट्र

maharashtra

'राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी.. स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा'

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी असून राज्याला स्थिर सरकार मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

By

Published : Nov 12, 2019, 8:50 PM IST

Published : Nov 12, 2019, 8:50 PM IST

देवेंद्र फडणवीस

मुंबई -राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे भाजपचे विधिमंडळ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा तिढा : त्वरित सत्ता स्थापन करा, जनेतेची मागणी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा... राज्यपालांची भूमिका संशयास्पद - प्रकाश शेंडगे

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details