महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

राज्यातील भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहे. राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीची ते राज्यपालांना माहिती देणार आहेत.

भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळांने घेतली राज्यपालांची भेट
भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळांने घेतली राज्यपालांची भेट

By

Published : Mar 23, 2021, 11:29 PM IST

Updated : Mar 24, 2021, 11:53 AM IST

मुंबई -माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत. यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. राज्यपालांची भेट घेऊन राज्यात होणाऱ्या परिस्थितीचा आढावा आपण घेऊन त्यांची माहिती राष्ट्रपतीकडे पाठवावी, अशी मागणी या नेत्यांनी यावेळी केली. या बद्दल माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना यापुर्वीच दिली होती.

मुनगंटीवार म्हणाले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत देत जनतेने मतरुपी आशीर्वाद दिला होता. मात्र, नंतर बेईमानी पद्धतीने महाविकास आघाडी सरकार आले. जनेतची थट्टा करत जनतेच्या हितासाठी काम करू असे आश्वस्त केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडतंय ते धिंडवडे काढणारे आहे.

परमबीर सिंग यांनी पत्राबाबतची सत्य माहिती राष्ट्रपती यांच्याकडे राज्यपालांनी दिली पाहिजे. या संदर्भात दोन दिवसांनी राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत राज्यपालांना देखील पत्र लिहिले आहे. हे गंभीर प्रकरण असले तरी सहजतेने हे प्रकरण घेतले जात आहे. महाराष्ट्राच्या अशा राजकारणात अधिकाऱ्यांनी समोर येत असे काही मंत्री आपल्याला करत असतील तर त्यांनी राज्यपालांकडे तक्रारी पाठवाव्यात. शपथ घेतलेले मंत्री जर आकस भाव दाखवत असतील तर घटनेच्या आधारावर राज्यपाल महोदयांनी राज्याची संपूर्ण परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना पाठवावी, असे मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी करत नाही, तर सत्याच्या आधारावर घटनेच्या तरतुदींवर राज्यपालांनी सत्य कथन असणारा अहवाल तयार करावा आणि राष्ट्रपतींकडे पाठवावा. उद्या महाराष्ट्रात अशी घटना झाली तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल.

Last Updated : Mar 24, 2021, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details