मुंबई - राष्ट्रपती पदाची जवळ आल्याने भाजपकडून रणनीती आखली जात आहे. या संदर्भात एनडीएने बोलावलेल्या बैठकीला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) हजेरी लावणार आहेत. दुपारी 1 वाजता ही बैठक सुरू होणार, असून एनडीएचे घटकपक्ष यावेळी उपस्थित राहणार आहेत.
भाजपने झिडकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. तसेच एनडीएतून बाहेर पडत आव्हान दिले. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला ( Shivsena ) हादरा देत, दिल्ली दरबारी जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती ( President ) पदाची निवडणूक जवळ आल्याने एनडीएकडून बैठकांचा जोर वाढवला आहे. देशभरात घटकपक्षांना या बैठकीला बोलावले असून शिंदे गटालाही निमंत्रण देण्यात आले आहे. शिंदे गटाने हे निमंत्रण स्वीकारले असून दीपक केसरकर बैठकीला जाणार आहेत. दुपारी 1 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुर्मु समर्थन दिल्याचे जाहीर -शिवसेना आणि एनडीएचे संबंध ताणले गेले आहेत. शिवसेना राष्ट्रपती पदासाठी कोणाला मतदान करणार यावर साशंकता होती. मात्र, शिवसेनेच्या खासदारांकडून एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मु समर्थन दिल्याचे जाहीर केले आहे. भाजप नव्हे, तर केवळ आदिवासी वर्गाला हा पाठिंबा असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, संजय राऊत -राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू ( draupadi murmu ) यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय खासदार यांनी मांडली. खासदारांची मत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. मातोश्री येथे खासदारांच्या बैठकीतून नाराजीने गेल्याची चर्चा चुकीचे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.