महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

President Ramnath Kovind In Rajbhavan : 'दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे - राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे राष्ट्रपती ( President Ramnath Kovind In Rajbhavan ) म्हणाले.

President Ramnath Kovind
President Ramnath Kovind

By

Published : Feb 11, 2022, 6:15 PM IST

Updated : Feb 13, 2022, 12:24 PM IST

मुंबई - आपल्या संविधानानुसार 'आम्ही भारताचे लोक' हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा लोकार्पण सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ( President Ramnath Kovind In Rajbhavan ) काढले.

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ( Ramnath Kovind inaugurating At Rajbhavan ) झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरबार हॉल लोकशाहीचे नवे प्रतीक

राजभवनात कोणतीही वैयक्तिक किंवा कोणतीही गोपनीय बाब नाही. जे काही घडते ते सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांसोबत, सार्वजनिकपणे पारदर्शकपणे, लोकसेवकांकडून जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याची पद्धत रूढ होत आहे. हे नवे दरबार हॉल आपल्या नव्या भारताचे, नव्या महाराष्ट्राचे आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे नवे प्रतीक आहे. राजभवनाच्या या दरबार हॉलमध्ये मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोरारजी देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता, अशी आठवण यावेळी राष्ट्रपतींनी सांगितली. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे मला त्यांचे स्वीय सचिव म्हणुन काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं.

महाराष्ट्राच्या महानतेचा अफाट प्रवाह

महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान राज्य असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या महानतेला अनेक परिमाण आहेत. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांचीच नावे मोजली तरी यादी संपणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराष्ट्राच्या महानतेचा असा अफाट प्रवाह दिसतो. यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली. मात्र, यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय, असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या.

राजभवन हे जनता भवन व्हावे

तिन्ही बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या राजभवनवर बाणगंगेचे, मुंबादेवीचे आणि सिद्धीविनायकाचे आशिर्वाद आहेत. राजभवन हे जनता भवन व्हावे, अशी इच्छा व्यक्त करुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, राजभवन उभे रहावे यासाठी रात्रं दिवस कार्य करणाऱ्या मजूरांचे विशेष योगदान आहे. राज्यपाल म्हणून मला मिळालेल्या अधिकारात राहून मी जनतेच्या भल्याचे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा -Hijab Ban Case : दिलीप वळसे पाटील यांचे हिजाब मुद्यावर शांती राखण्याचे आवाहन

Last Updated : Feb 13, 2022, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details