मुंबई - धनत्रयोदशीपासून दिवाळीला प्रत्यक्षात सुरुवात होते. मागील वर्षी कोरोना धोरणाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करता आली नव्हती. याचा खूप मोठा फटका बसला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे यंदा दिवाळीची तयारी सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही जोरदार केली आहे.
धनत्रयोदशीला अतिउत्साहाने पूजा करणार आहोत. कारण मागील वर्षी आमचा व्यवसायाचा महत्त्वाचा काळ वाया गेला होता. यंदा खूप आनंदी आहोत. खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी होत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. दिव्याची आरास लावून आणि उत्साह सण केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात.
हेही वाचा-Diwali 2021 : देशाच्या राजधानीत 'अशा' पध्दतीने साजरी करतात दिवाळी
धनत्रयोदशीचे महत्त्व-
दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी आहे. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिले जाते.
हेही वाचा-विशेष : दिवाळीत आरोग्याची काळजी कशी घ्याल?
धन्वंतरीची पूजा
धनत्रयोदशीबाबत दंतकथाही आहेत. आश्विन वद्य त्रयोदशी असेही म्हटले जाते. शेतकरी व कारागीर नांगर आदी अवजारांची पूजा करतात. नैवेद्यही दाखवला जातो. हार, फुले वाहिली जातात. आयुर्वेदातही या दिवसाला विशेष महत्व आहे. धन्वंतरीची पूजा केली जाते.
हेही वाचा-दिवाळीतील पारंपारिक फराळात बदल; ड्रायफ्रुट्स, मिठाई आणि चॉकलेट्सची मागणी
मार्केटमध्ये चैतन्य
दिवाळीनिमित्त मार्केटमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. व्यापारी वर्ग आनंदात आहे. मोबाईल मार्केटही जोरात आहे. नवीन मोबाईल खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.
फेरीवाल्यांमध्ये आंनदी वातावरण
दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नागरिक मार्केटला येत असल्याने फेरीवालेही आनंदी आहेत. अनेक छोटे-मोठे फेरीवाले वस्तू खरेदीसाठी बाजारात बसले आहेत. आपल्या कुवतीनुसार नागरिक वस्तू खरेदी करत आहेत. सर्वच फेरीवाल्यांच्या स्टॉलवर गर्दी दिसत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची चांगली कमाई होत आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणारे फेरीवाले त्यांची जागा धनत्रयोदशीनिमित्त पूजणार आहेत.