मुंबई -मुंबईत मंगळवारी 45 हजार 524 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण 17 लाख 53 हजार 452 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आजपर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत मंगळवारी 45 हजार 524 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 37 हजार 852 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 672 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 17 लाख 53 हजार 452 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 15 लाख 50 हजार 463 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 2 हजार 989 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 60 हजार 206 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 84 हजार 869 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 88 हजार 888 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 लाख 19 हजार 489 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 22 हजार 289 तर आतापर्यंत 11 लाख 44 हजार 869 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 5 हजार 385 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 19 हजार 420 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 17 हजार 850 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 4 लाख 98 हजार 163 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा-सातारा: जावळीतील दहावीच्या 11 विद्यार्थ्यांना कोरोना
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,60,206
फ्रंटलाईन वर्कर - 2,84,869
जेष्ठ नागरिक - 6,88,888
45 ते 59 वय - 5,19,489
एकूण - 17,53,452