मुंबई - वरळीतील सिलेंडर स्फोट प्रकरणानंतर भाजप नेते आशिष शेलारयांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत ( Mumbai Mayors issue in winter session ) टीका केली होती. या वक्तव्याचे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटले. यामुळे सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
आमदार डॉ. मनीषा कायंदे ( Manisha Kayande on controversial statement on Mumbai Mayor ) , विलास पोतनीस ( MLA Vilas Potnis in winter session ), रवींद्र फाटक व अंबादास दानवे यांनी महापौरांवरील आक्षेपार्ह विधान , दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवरुन हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा-मुंबई नवजात बालक मृत्यू प्रकरण; प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची सभा तहकूब
सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर
राजकीय नेत्याने पत्रकार परिषदेत महापौराबाबत समस्त महिला वर्गाचा अपमानहोणारे वक्तव्य केले. याप्रकरणी चार्जशीट का दाखल केला नाही, सवाल शिवसेनेच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून दोषींला अटक करावी, अशी मागणी परिषदेत करण्यात आली. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रस्त्यांना हेमा मालिनीच्या गालाची उपमा देणारे विधानाचे काय, असा सवाल केला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर ( assembly session discussion on Mumbai Mayor ) आले.