मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाला मशाल मिळाली पण शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाने रिक्षा हे चिन्ह दिल्याची चर्चा (Eknath Shinde gave rickshaw party symbol) आहे. रिक्षा आणि एकनाथ शिंदेयांचे एक वेगळे नाते आहे. सुरूवातीला ते रिक्षा चालवणारा शिवसैनिक म्हणुन ओळखले जायचे पाहुया शिंदे आणि रिक्षाचे नाते काय (Shinde group new election symbol connection) आहे.
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह वादावर निवडणूक आयोगाने ( Election commission ) तोडगा काढताना ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हेनिवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले. मात्र, ठाकरे गटाने मागितलेले दोन चिन्ह शिंदेंनी मागितल्याने निवडणूक आयोगाने नव्याने चिन्ह देण्याचे आदेश दिले ( Shinde group new election symbol ) आहेत.
शिंदेंचा जीवनप्रवास :एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव आहे. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आता ते एमए करत (Shinde group new election symbol)आहेत.
राजकारणात एन्ट्री : (Eknath Shinde Political Journey)-गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातील कमी मिळकतीमुळे शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली. आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
राजकीय प्रवास : शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997 मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Shinde and proposed party symbol of rickshaw) आहेत.