महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सत्तेतील सहभागाचा निर्णय पवार-सोनियांच्या भेटीनंतरच - काँग्रेस

येत्या 17 व 18 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक होणार असून त्यावेळीच शिवसेनेसोबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

By

Published : Nov 14, 2019, 3:24 PM IST

राष्ट्रवादी-काँग्रेस

मुंबई- राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्तेमध्ये किती प्रमाणात सहभाग घ्यावा, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच काँग्रेस सत्तेत सहभागी होणार की बाहेरुन पाठिंबा देणार हे ठरवता येईल, असे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे.

तसेच येत्या 17 व 18 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक होणार असून त्यावेळीच शिवसेनेसोबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या बैठकीत जाहीरनामा व शिवसेनेसोबतच्या विचारसरणीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्याने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details