मुंबईहर घर तिरंगा (Har Ghar Tiranga)या मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेतर्फे तिरंगा वितरण सुरू आहे. तिरंगा वितरण अंतिम टप्प्यात असतांना नागरिकांकडून ध्वजा बरोबर काठीची ही मागणी होत आहे. मात्र महापालिका तिरंगा सोबत काठी देऊ शकत नाही. तेव्हा लोकप्रतिनिधींनी लोक सहभागातून काठ्या द्याव्यात, (municipal corporation over the stick of the flag) असे महापालिकेचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित सूचना सर्व महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेने ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा वितरण सुरू केले. तिरंगा वितरण आता अंतिम टप्प्यात आले असून; 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबईत कशी होणार अंमलबजावणीमुंबई महानगरपालिकेच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून, महापालिका प्रशासनातर्फे मुंबई पन्नास लाख ध्वज उभारले जाणार आहे. यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 35 लाख देण्यात येत आहे. विविध कार्यालय आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून मिळून 50 लाख उभारले जातील, असे पालिकेचे म्हणणे आहे.