महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 15, 2022, 8:17 AM IST

ETV Bharat / city

CM Thackeray on Gujarati people : मला गुजराती कळते, पण बोलता येत नाही! मुख्यमंत्र्यांची गुजराती समाजाला साद

मुंबईतील एका ( CM Thackeray on Gujarati people ) वृत्तपत्राला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ( Cm Thackeray communicate with Gujarati people ) करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजराती बांधवांना साद घातली. आपल्याला गुजराती भाषा समजते, पण बोलता येत नाही. गुजराती भाषिक महाराष्ट्रात साखरा सारखे विरघळून गेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

cm thackeray at mumbai samachar program
गुजराती वृत्तपत्र कार्यक्रम मुंबई उद्धव ठाकरे उपस्थिती

मुंबई - मुंबईतील एका वृत्तपत्राला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ( Cm Thackeray communicate with Gujarati people ) करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजराती बांधवांना साद घातली. आपल्याला गुजराती भाषा समजते, पण बोलता येत नाही. गुजराती भाषिक महाराष्ट्रात साखरा सारखे विरघळून गेले. गुजरात आणि महाराष्ट्राचे नाते येणाऱ्या काळात अजून दृढ होईल, असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

हेही वाचा -Shiv Sainik arrive in Ayodhya : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल, रेल्वे स्थानकावर दिल्या घोषणा

काल मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता गुजराती समाजाला साद घातली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वृत्तपत्राला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. वृत्तपत्राने यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्षे पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे म्हटले.

या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा. मला अभिमान आहे या महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र 200 वर्षे पूर्ण करत आहे. हेच तर आपले प्रेम आहे. मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरे सारखे एकमेकात विरघळून गेले आहेत. आपण देखील वृत्तपत्र चालवतो. वृत्तपत्र चालवणे कठीण असते. वृत्तपत्रात कोण कुठे चुकते ते दाखवून देणे पत्रकारांचे कर्तव्य असते आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील 141 वर्षे झाली आहेत. याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला होता. लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार असल्याचे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -ED Summons to Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details